Published On : Thu, Sep 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रेमचंद राठोड सन्मानित

Advertisement

कन्हान : – भारताचे दुसरे राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधा कृष्ण यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन नागपुर जिल्हा परिषद येथील कै. आबासाहेब खेडकर सभागृहात साजरी करण्यात आली.

सोमवारी (दि.५) ला शिक्षक दिनाचे औचित्य साधुन पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत कोयला खदान शाळेतील उपक्रमशिल शिक्षक प्रेमचंद बळी राम राठोड यांच्यासह जिल्ह्यातील तेरा प्राथमिक, तीन माध्यमिक शाळेतील व एक विशेष शिक्षक अशा एकु ण सतरा शिक्षकांना जिल्हा परिषद नागपुर च्या वतीने ” जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार सुनीलबाबु केदार यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रश्मीताई बर्वे यांचे अध्यक्षतेखाली झाले.

प्रमुख अतिथी म्हणुन आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ सुमित्रा कुंभारे, शिक्षण सभापती भारती पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पारशिवनी पंचायत समिती च्या सभा पती सौ. मीना कावळे तसेच जिल्हा परिषदेचे पदाधि कारी, अधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पद वीधर शिक्षक खुशाल कापसे यांनी तर आभार प्रभारी उपशिक्षणाधिकारी भास्कर झोडे यांनी व्यकत केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.