नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे महत्त्वाची मागणी केली आहे. या सोहळ्यानिमित्ताने दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये,अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा मुक्तीचा दिवस आहे. दरवर्षी प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो, यावर्षी १२ ते १३ ऑक्टोबर दरम्यान दिक्षा भूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी हा सण साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात.
एवढ्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सण असताना त्यांच्याकडून टोल वसूल केला जातो. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. मी वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी आकारण्यात येणारा टोल माफ करावा, कृपया आपण त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा,अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे आंबेडकर यांनी केलेली मागणी पूर्ण करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





