Published On : Tue, May 16th, 2017

स्वयंरोजगारासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना

Advertisement

mudra-min
नागपूर:
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा यासाठी या योजनेचा प्रचार व प्रसार तसेच समन्वय करण्याकरीता जिल्हा स्तरावर मा. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री मुद्रा बँक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. त्यात मुद्रा बँक योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु बेराजगार, बुध्दिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो तरुणांना एखादा लहान उद्योग किंवा व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी भांडवलाची अडचण या मुद्रा योजनेद्वारा दूर करण्यात येणार आहे. बँकाच्या माध्यमातून कर्ज देण्याचे प्रयोजन केंद्र शासनातर्फे करण्यात आले आहे. उद्योग व्यवसाय थाटण्यासाठी अनेक अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते.

देशातील दुर्गम व ग्रामीण भागातील गरीब व होतकरु तरुणांना व्यवसाय सुरु करुन उद्योजक बनण्यासाठी तसेच त्यांना बेरोजगारीतून मुक्त करण्यात राष्ट्रीयकृत व अन्य बँका सिंहाचा वाटा उचलू शकतात. परंतु माहितीचा अभाव व अशिक्षितपणा यामुळे गरीब व्यक्ती बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे बँक अधिकारी पूर्ण सहयोग करण्यास असमर्थ असतात. त्यात बँक अधिकारी यांना कर्ज वसुलीची चिंता असल्यामुळे कर्ज देताना विचार करावा लागतो. यासाठी सरकारने संबंधित जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे. यामध्ये लहान उद्योगांकरीता जसे सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीवाले व फळविक्रेते इत्यादी लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील कर्ज देण्याची तरतूद आहे.

यासोबतच डी.एफ.एस. वित्त मंत्रालय भारत सरकारतर्फे 23 जून 2016 पासून बँकांना सूचित करण्यात आले आहे की, कृषी संबंधित कार्य जसे मत्स्यपालन, मधमाशा पालन, कुक्कुट पालन, पशुधन, कृषी कारोबार, खाद्ये व कृषी प्रोसेसिंग उद्योग इत्यादीसाठी अर्थसहाय्य प्रदान करुन जिविका व आय सृजन (उत्पन्न) वाढविण्यासाठी दिनांक 1 एप्रिल 2016 पासून वरील योजनाचा समावेश करुन मुद्रा ऋण योजनांच्या नियमानुसार व अटी व शर्तीच्या अधिन राहून ऋण वाटण्यास मंजूरी दिली आहे.

Advertisement
Advertisement

शिशु ऋण : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत बचत खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्याची या योजनेत तरतूद आहे. सोबतच 50 हजार रुपयांपर्यंत ऋण देण्याची तरतूद आहे.

किशोर ऋण : यामध्ये 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत मोठा व्यवसाय, उद्योगधंदा लावण्यासाठी ऋण देण्याची सुविधा आहे.

तरुण ऋण : यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत मोठा व्यवसाय, उद्योगधंदा सुरु करण्यासाठी ऋण देण्याची सुविधा आहे.

यासाठी आपल्या क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा तसेच इंडियन बँक असोसिएशन व एस.एल.बी.सी. द्वारा इंग्रजी व हिन्दीमध्ये सर्वांसाठी कॉमन लोन आवेदन फार्म उपलब्ध आहे. सोबतच उद्योजक, ट्रेडींग व सेवा इत्यादीसाठी ऋण घेण्याची तरतूर आहे. फुड प्राडॅक्शन सेक्टरमध्ये सुध्दा मुद्रा लोन मिळू शकते. मुद्रा लोन घेण्यासाठी सिक्युरीटी व थर्डपार्टी जामिनाची आवश्यकता नाही.

मुद्रा रुपये, डेबीट कार्ड, कॅश क्रेडीट खात्यात उपलब्ध आहे. सरकारद्वारे याआधी पण अनेक योजना अमलात आणल्या गेल्या आहेत. परंतु सकारात्मक दृष्टिकोन नसल्यामुळे त्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकल्या नाहीत. कोणत्याही क्षेत्रास यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. एखादा व्यवसाय उभारल्यानंतर त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असला पाहिजे. जो व्यवसाय, उद्योग निवडल्यानंतर उद्योजकाने तो जिद्दीने यशस्वी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. कोणताही उद्योग उभारणी आधी संबंधित उद्योगाचे प्रशिक्षण घेवून त्याची पूर्ण माहिती करुन घेणे आवश्यक आहे. तसेच उद्योगाची जागा सुध्दा महत्वाची आहे. कोठेही उद्योग चालू शकत नाही. त्यासाठी योग्य जागा असणे आवश्यक आहे. उद्योग चालावा या दृष्टीनेही उद्योजकात आत्मविश्वास असायला पाहिजे.

कोणताही उद्योग उभारण्यापूर्वी पाच गोष्टी महत्वपूर्ण असतात. भूमी, श्रम, भांडवल, संघटन, साहस यात भांडवल हा महत्वपूर्ण घटक आहे. भांडवलाशिवाय उद्योगाची पुढची वाटचाल होऊ शकत नाही. देशातील लाखो युवक पुंजी नसल्यामुळे उद्योग उभारण्यापासून वंचीत आहेत. त्यासाठी मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छोट्या उद्योगांना मुद्रा बँक योजनाद्वारा राष्ट्रीयकृत व अन्य बँकांच्या सहाय्याने ऋण उपलब्ध करुन देण्यासाठी बिनातारण मुद्रा बँक योजनेचा शुभारंभ केला आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी घ्यावा व आपला उद्योग यशस्वी करुन देशाच्या विकासाला हातभार लावावा. कोणत्याही उद्योगाला यशस्वीपणे राबविण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते.

सुरुवातीला सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर मार्केटींग अभावी मालाला चांगली बाजारपेठ न मिळाल्यास नुकसान सुध्दा सहन करावे लागते. यासाठी त्याला आपल्या मालाला बाजारपेठ मिळवून स्व:निर्मीत माल मोठ्या प्रमाणावर विकून त्यातून लाभ कमावण्याची जिद्द ठेवायला पाहिजे. त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण व अर्धशहरी भागात मुद्रा लोन मिळविण्यासाठी युवकांना त्यांचे अज्ञान व अपूर्ण माहितीमुळे त्यांना बँकेकडून सहकार्य मिळत नाही. यासाठी त्यांना आपल्या धंद्याविषयीचे संपूर्ण ज्ञान व आत्मविश्वास असल्याशिवाय लोन मिळू शकत नाही. साधारणपणे अर्ज सादर केलेल्या तारखेपासून 15 ते 21 दिवसाच्या आत त्यांचे लोन मंजूर व्हायला पाहिजे. यासाठी त्याला बँकेने मागितलेली सर्व कागदपत्रे देणे आवश्यक असते.

सोबतच ऋण मंजूर झाल्यानंतर मुद्रा योजनेतून मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करुन बँकेचा हफ्ता भरणे तेवढेच महत्वाचे असते.
उद्योजकाने बँक लोन योग्य वेळेस परत केल्यास त्याला उद्योगवाढीसाठी पुन्हा ऋण मिळू शकते व तो मोठा उद्योजक होवू शकतो.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement