Published On : Mon, Aug 17th, 2020

नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात पीपीई भेट

-ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्थेचा पुढाकार


नागपूर. राज्यासह नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विषाणूंनी संसर्ग वाढतच आहे. अशात गेल्या पाच महिन्यापासून फ्रंट लाईन कोरोनाशी युद्ध करणारे पोलिस विभागातील कोरोना वारीयर्स आपली सेवा बजावीत आहे. नागपूर ग्रामीण पोलिस दलात कर्तव्य बजाविणाऱ्या कोविड योद्धाना ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्थेतर्फे पीपीई किट भेट देण्यात आली.ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्थेचे प्रमुख श्री. विजय ढवळे यांनी नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांना 10 पीपीई किट सोपविले. याप्रसंगी प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) संजय पुरंदरे यांची उपस्थिती होती.

यावेळी विजय ढवळे यांनी सांगितले की, पोलिस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कंटेन्मेंट झोन परिसरात सेवा द्यावी लागते. त्यामुळे ते फ्रंट लाईन कोरोनाशी युद्ध लढतात. म्हणून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या पीपीई किट देण्यात आल्या.

संस्था जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यामध्ये मानसिक आरोग्य आणि दिव्यांगता क्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे आतापर्यंत विविध भागात 200 पीपीई किट भेट करण्यात आल्या आहेत. संस्थेद्वारे कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला संस्थेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.