Published On : Mon, Feb 1st, 2021

वंजारी नगर, कुकडे ले आऊट येथील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

नागपूर: महावितरणच्या मेडिकल वीज उपकेंद्रात बुधवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी देखभाल- दुरुस्ती करायची असल्याने या दिवशी कुकडे ले आऊट, वंजारी नगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत वरील भागासह चंद्रभान नगर,कौसल्या नगर,वासनात नगर,कैलास नगर,भगवान नगर,बॅनर्जी ले आऊट, बालाजी नगर,नाईक नगर, ओंकार नगर, कुंजीलालपेठ येथील वीज पुरवठा बंद राहील.