
छत्रपती संभाजीनगर – राज्य निवडणूक आयोगाने काही नगरपरिषदांच्या निवडणुका अचानक थांबवण्याच्या निर्णयामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही जणांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले. मात्र, या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,हा निर्णय कायद्याला धरून नाही. उमेदवारांशी हा सरळ अन्याय आहे. मतदानाच्या आदल्या रात्री असे आदेश काढणे अत्यंत धक्कादायक आहे.
फडणवीस यांनी आयोगाच्या अधिकारांवरच प्रश्न उपस्थित करत म्हटले.आयोगाने कोणत्या कायद्यानुसार असा निर्णय घेतला? कोणी कोर्टात गेला म्हणून एवढ्या महत्त्वाच्या प्रक्रियेत शेवटच्या क्षणी बदल कसे करता येतात?
तसेच, निकाय निवडणुकीत विरोधकांचा पूर्ण अभाव असल्याची टीका करत ते म्हणाले.विरोधी पक्षांचे नेते कार्यकर्त्यांपासून पूर्णपणे दूर झाले आहेत. पराभव ठरलेला दिसत असल्याने जबाबदारी टाळण्यासाठी कुणीच प्रचारात दिसले नाही.राज्यातील निवडणूक वातावरण तंग असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानांमुळे राजकीय तापमान आणखी चढल्याचे पाहायला मिळत आहे.









