Advertisement
नागपूर; गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या रामनगर परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून फडणवीस यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले आहे.या होर्डिंगवर विकास वृत्ती असे लिहून त्याखाली देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे.
तर वसुली बुद्धी असे लिहून त्याखाली अनिल देशमुख यांचा फोटो लावण्यात आला आहे.अनिल देशमुख यांचा फोटो ब्लॅक बॅकग्राऊंडवर असून त्यासमोर तुरुंगात दाखविण्यात आलेला आहे.
दरम्यान नागपुरात लावण्यात आलेल्या या पोस्टरवरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वाद पेटणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.