Published On : Mon, Sep 9th, 2019

बायोफ्यूएलचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे: केंद्रीयमंत्री श्री नितीन गडकरी

Advertisement

‘ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल’च्या प्रसार वाहनाचे लोकार्पण.

नागपूर प्रसार वाहनाचे लोकार्पण केल्यानंतर ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांना प्रसार वाहनांची चावी व योजना सर्वदूर पोहोचविण्याची जबाबदारी देताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, यावेळी उपस्थित फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुख्य संशोधक डॉ. हेमंत जांभेकर व इतर.

नागपूर: बायोफ्यूअलनिर्मितीतून शेतकरी, बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे बायोफ्यूएलचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनची प्रसार वाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढवेल, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

रामनगर येथील केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनच्या प्रसार वाहनाचे लोकार्पण झाले. त्यांनी फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांच्याकडे या प्रसार वाहनाच्या चाव्या सोपविल्या. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष व संशोधक डॉ. हेमंत जांभेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माननीय गडकरी यांनी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत जैवइंधन, इथेनॉलनिर्मितीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा, थेट उद्योगाशी शेतकऱ्यांना जोडणे आदीवर त्यांनी चर्चा केली. कृषी मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी नैराश्‍याने ते फेकून देतो. या कृषी मालाचा उपयोग इथेनॉल, जैवइंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल. त्यादिशेने ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन कार्य करीत असल्याचे यावेळी अजित पारसे यांनी सांगितले. आज केवळ एका वाहनाचे लोकार्पण झाले. मात्र, प्रत्येक गावांसाठी अशा बायोफ्यूएअल व ग्रीन क्रूडबाबत जनजागृतीसाठी वाहन उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना इंटरनेट, ‘इंडिया फॉर इथेनॉल’ या ‘वेब पोर्टल’वर नोंदणीचे प्रशिक्षण देण्यात येईल. जैवइंधन काय आहे? कसे तयार करता येईल? त्यातून रोजगारनिर्मितीची क्षमता आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही पारसे यांनी सांगितले.

Advertisement

माननीय केंद्रीयमंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिलेली जबाबदारी आम्ही सकारत्मकरीत्या पार पाडणार. शंभर टक्के आर्थिक स्वातंत्र आणि शेतकऱ्यांचा उत्कर्षाच्या माध्यमातून राष्ट्र विकासाचे नितिनजिचे स्वप्न पूर्ण करणार.

– अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.