
नागपूर : देशात लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला असून एकून ७ टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
महाराष्ट्रात कधी मतदान –
– पहिला टप्पा (19 एप्रिल) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
– दुसरा टप्पा (26 एप्रिल)- बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
– तिसरा टप्पा (7 मे) – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
– चौथा टप्पा (13 मे)- नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
-पाचवा टप्पा (20 मे) – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेत.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...



