Published On : Fri, Feb 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

राजकीय खेळी; संपूर्ण महाराष्ट्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या तर कनिष्ठ कर्मचारी एकाच लोकसभा क्षेत्रात!

Advertisement

नागपूर : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेपूर्वी, एकाच जिल्ह्यात दीर्घ कालावधीसाठी कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात बदल्या करण्यात येत आहेत. बदल्यांची मालिका महाराष्ट्रात IPS फेरबदलाने सुरू झाली. तर आदेशात पोलीस निरीक्षक (PIs), सहाय्यक पोलीस निरीक्षक (APIs) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांच्या बदल्यांचाही प्रस्ताव आहे.

PIs च्या बदल्या सुरू केल्या गेल्या असताना, APIs आणि PSI च्या बदल्यांचा विचार केल्यास लक्षणीय असमानता दिसून येते.यासंदर्भात ‘नागपूर टुडे’शी बोलताना, एपीआय आणि पीएसआय यांनी त्याच लोकसभा क्षेत्रातील बदलीबद्दल निराशा व्यक्त केली.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची ही निव्वळ थट्टा –

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विशेषत: कोणत्याही जिल्ह्यात त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या PI, API आणि PSI सह कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली इतर ठिकाणी करणे गरजेचे आहे. मात्र शहर पोलिसांमध्ये अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र हे सरार्स चुकीचे असून नागपूर, नवी मुंबई, पिंपरी -चिंचवड, ठाणे आणि नाशिक आयुक्तालयातही अशाच प्रकारे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची ही निव्वळ थट्टा उडवण्यात आली आहे.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसातर, एपीआय हे केवळ राजपत्रित पद नाही. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पीआयची कमतरता असल्याने गुन्हे शाखेचे एपीआय महत्त्वाच्या तपासात आपली भूमिका बजावत आहेत. संपूर्ण प्रदेशात त्यांचे तगडे नेटवर्क पसरले आहे. कदाचित एकाच लोकसभा मतदारसंघात त्यांची बदली हा राजकीय निर्णय असू शकतो,अशा चर्चांना उधाण आले आहे.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की विशिष्ट एजन्सींमध्ये (SID, PCR, CID, HSP, ACB, ATS, इ.) कार्यकाळ पोस्टिंगची गणना करताना, ते विचारात घेतले जाणार नाहीत. सर्व निकषांची पूर्तता करूनही एपीआय आणि पीएसआय आपल्या बदल्यांपासून निराश आहेत. आता या घडामोडीवर निवडणूक आयोग कोणती पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-शुभम नागदेवे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.