नागपूर : पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे घरात रोजच वाद पेटत होते. त्यामुळे पत्नीच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. तिने एक चिठ्ठी लिहिली आणि अजनी रेल्वेस्टेशन गाठले. धावत्या रेल्वेसमोर उडी घेण्याच्या तयारीत असतानाच त्याठिकाणी पोलीस धडकले आणि त्या महिलेचा जीव वाचवला. ही घटना गुरुवारी दुपारी घडल्याची माहिती आहे.
रामटेक येथील रहिवासी प्रियंका (काल्पनिक नाव) एका खासगी रूग्णालयात नोकरी करते. पती एका कंपनीत नोकरीला आहे. त्यांना दोन मुले आहेत. दोघांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. गुण्यागोविंदाने संसार सुरू असतानाच त्याच्या मनात संशयाने घर केले. वयाने लहान असलेल्या पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत, असा संशय त्याला येत होता.
बुधवारीसुद्धा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. ती नागपुरात आली. अजनी रेल्वेस्थानकावर थांबली. तिच्या मनात तिच्या मुलांचा विचार आला. आणि तिने आत्महत्या करण्याचा विचार बदलला. तसेच त्याठिकाणी असलेल्या पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी महिलेची समजूत काढली आहे.