नागपूर – गावाकडच्या मैत्रीणीसोबत वर्षभर शरिरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला लग्नास नकार देणा-या पोलीस उपनिरीक्षकाचे (पीएसआय) भवितव्य धोक्यात आले आहे. शिवराज नागनाथ हाडे (वय २८) नामक या पोलीस उपनिरीक्षकावर सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे.
हाडे गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलीस ठाण्यात तैनात होता. तो मुळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. माहूर येथील तरुणी (वय २७) वर्षभरापूर्वी फेसबूकच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात आली. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असून, अजनी परिसरात राहते. मैत्रीनंतर तास न तास आॅनलाईन चॅटिंग करून एकमेकांच्या संपर्कात राहणा-या या दोघांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी नागपुरात प्रत्यक्ष भेटीचा निर्णय घेतला. तो गडचिरोलीहून सीताबर्डीत आला.
येथे हल्दीरामसमोर त्यांची भेट झाली. त्यानंतर ते एका लॉजमध्ये गेले. तेथे त्यांनी शरिरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन ते नियमित एकमेकांना भेटू लागले. ३० आॅक्टोबर २०१७ पर्यंत सर्व काही व्यवस्थीत होते. अचानक त्याच्या वर्तनात बदल झाल्याचे जाणवल्यामुळे तिने चौकशी केली असता तो दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने सरळ गडचिरोली गाठली. त्याला भेटून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे आठवडाभरापूर्वी तिने गडचिरोली पोलिसांत हाडेविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. प्रकरण नागपूरमध्ये झाल्याने गडचिरोली पोलिसांनी शून्यची क्राईमी करून प्रकरण तपासासाठी सीताबर्डी पोलिसांत पाठविले.
हाडे कव्हरेज क्षेत्राबाहेर
सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक किर्लेकर यांना तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर हाडेने त्याचा मोबाईल बंद केला अन् तो फरार झाला. त्याच्या मोबाईलवर पोलीस वारंवार संपर्क करीत असून, प्रत्येक वेळी ह्यहा क्रमांक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याची केसेट ऐकत आहे. फरार हाडेचा पोलीस शोध घेत आहेत.

