Published On : Sat, May 8th, 2021

पोलिस एक प्रज्ञावंत भूमिकेचा शिलेदार-पी आय राहुल शिरे

Advertisement

कामठी :-‘सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय ‘हे ब्रीद वाक्य वापरून शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी पोलिसवर्ग पार पाडत असतात तसेच या पोलीस खात्यात कार्यालयीन अभ्यास व कर्तव्यदक्ष भूमीकेचा अनुभव हा लपवता येत नाही तर कार्यालयीन वेळेत प्राप्त झालेला ज्ञानाची शिकवण ही रिक्त ठिकाणी पर्यायी म्हणून नियुक्त झालेल्या सहपाठी कर्मचारीला सांगणे हे गरजेचे असते तर वरिष्ठांच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची त्यांच्या अनूभवाच्या शिकवणीची अत्यंत गरज असते यावरून प्राप्त ज्ञानाला आपल्यापुरते न ठेवता त्याचा प्रसार करून पुढच्याला ज्ञानार्जन करून देणे म्हणजे प्रज्ञावंत कार्य आहे

त्यामुळे पोलिस हा एक प्रज्ञावंत भूमिकेचा शिलेदार असल्याचे मनोगत जुनी कामठी पोलिस स्टेशन चे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन ला आयोजित सत्कार व भावपूर्ण निरोप समारंभ कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले याप्रसंगी जुनी कामठी हुन नवीन कामठी पोलीस स्टेशन ला बदली झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय मालचे यांनी सुद्धा समयोचित असे वक्तव्य केले.

जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पदभार सांभाळणारे पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्या शुभ हस्ते तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय मालचे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला.याप्रसंगी एपीआय युनूस शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक मदनकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र पाटील, पोलीस शिपाई रशीद, पाली, बांगडी, महिला पोलीस शिपाई स्वाती चटोले, दीप्ती मोटघरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन एपीआय युनूस शेख तर आभार गुप्त विभागाचे शैलेश यादव यांनी मानले.

संदीप कांबळे