Published On : Fri, Sep 28th, 2018

नागपुरात मसाज पार्लरआड सुरू असलेला पुन्हा एक कुंटनखाना उघड

नागपूर : उपराजधानीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचे अड्डे हळूहळू उघडकीस येत असतानाच बेलतरोडीतीलही एका कुंटनखान्याचा छडा लागला. बेलतरोडी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा कुंटनखाना शोधून काढत तेथून एक वारांगणेला ताब्यात घेतले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारी महिला आरोपी बरखा विजय मेश्राम (वय ३३, रा. चंद्रमणीनगर) आणि तिचा साथीदार आशिष सर्जेराव सयाम (वय २७, रा. गिट्टीखदान) या दोघांना अटक केली.

झपाट्याने वाढणा-या आणि विकसित होणा-या उपराजधानीत हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चांगलाच फोफावला असून, देशीच नव्हे तर विदेशातील वारांगणांना नागपुरात बोलवून दलाल एका रात्रीत आंबट शौकीन ग्राहकांकडून हजारो रुपये उकळत आहेत. या आठवड्यात प्रणिता जयस्वाल आणि सचिन सोनारकर हे दोन मोठे दलाल पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून तीन रशियन (उझबेकिस्तान) वारांगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट चालविणा-या प्रणिता आणि सचिनच्या अटकेनंतर ठिकठिकाणच्या दलालांनी शहरातून पळ काढला असला तरी अनेक दलाल आणि वारांगणा अजूनही बिनबोभाट वेश्याव्यवसाय करत आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बेलतरोडीतील एका बहुमजली ईमारतीत आरोपी बरखा मेश्राम आशिष सयामच्या मदतीने मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटनखाना चालवित असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त राजेंद्र धामनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय तलवारे, उपनिरीक्षक संदीप आगरकर आणि त्यांच्या सहका-यांनी कारवाईचा सापळा रचला. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी बरखाकडे एक ग्राहक पाठविले. दोन हजारांची मागणी करून त्याला बरखाने वारांगणा उपलब्ध करून दिली. काही वेळेनंतर पोलिसांनी तेथे छापा घातला आणि ग्राहकासोबत वारांगणेला ताब्यात घेतले. पैश्याचे आमिष दाखवून बरखा आणि आशिष वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती वारांगणने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बरखा व आशिषविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

तीन सदनिका, सर्वच व्यवस्था!
बरखा आणि आशिषने या भागात वेगवेगळ्या तीन सदनिका महिन्याला १५ हजार रुपये भाड्याने घेतल्या. प्रत्येक सदनिकेत बेडसोबत खाण्यापिण्याचीही व्यवस्था ते उपलब्ध करून देत होते. चार महिन्यापासून त्यांचा हा कुंटणखाना सुरू होता. त्यांच्याकडे ठरलेले ग्राहक यायचे. बरखाकडून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कारवाईदरम्यान दोन हजार रुपये आक्षेपार्ह वस्तू आणि एक डायरी जप्त केली. या डायरीत अनेक ग्राहकांची नावे असल्याचे पोलीस सांगतात.

१३ दिवसात सातवी कारवाई
उपराजधानीत हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय कसा फोफावला आहे, ते गेल्या काही दिवसांतील कारवायांमधून उघड झाले आहे. गेल्या १३ दिवसांत कुंटणखान्यावर झालेली ही सातवी कारवाई आहे. त्यातील सर्वात मोठी कारवाई १४ सप्टेंबरला रामदासपेठेतील लोहारकर बंधूच्या सलूनमध्ये, २० सप्टेंबरला धंतोलीतील हॉटेल केपीईनमध्ये आणि २४ सप्टेंबरला सीताबर्डीतील हॉटेल गंगाकाशीमध्ये झाली होती. लोहारकर बंधूंकडे पाच वारांगना आढळल्या होत्या. केपीईनमध्ये प्रणिता जयस्वालकडे दोन उझबेकिस्तानच्या तर २४ सप्टेंबरला हॉटेल गंगाकाशीमध्ये सचिन सोनारकरसोबत उझबेकीस्तानची एक वारांगना पकडण्यात आली होती.

Advertisement
Advertisement