Published On : Fri, Jun 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीणमधील टायगर इको रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; १० आरोपींना अटक,८ महिलांची सुटका

डान्स करणाऱ्या युवतींवर पैसे उडवत होते ग्राहक
Advertisement

नागपूर – खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभूरडोह परिसरातील टायगर इको रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टी आणि देहव्यवसायावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान डान्स करणाऱ्या आठ युवतींची सुटका करण्यात आली असून, रिसॉर्ट मालकासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.

ही पार्टी विशाल सुधाकर इंगोले या इसमाच्या मालकीच्या टायगर इको रिसॉर्टमध्ये सुरू होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता, रिसॉर्टमध्ये चरस, गांजा, एमडी यासारख्या अमली पदार्थांचे सेवन चालू होते तसेच जुगारही सुरू होता. काही युवतींच्या डान्सदरम्यान काही ग्राहक त्यांच्यावर खुलेआम पैसे उडवत होते.

अटक केलेले आरोपी व माहिती-
पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यामध्ये –

रिसॉर्ट मालक विशाल इंगोले

Advertisement

महिला आरोपी

अमित अपरेजा, संजय धापोडरकर, सचिन पाटील, मनीष देशमुख

तसेच ग्राहक म्हणून उपस्थित असलेले नितीन कोकरडे, दिलीप साहू, विनोद मोहबे आणि किशन येसने यांचा समावेश आहे.

सर्व आरोपी नागपूर शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे. पकडलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून संजय धापोडरकर यांच्या फोर्ड वाहनातून या रिसॉर्टमध्ये आणले गेले होते.

देहव्यवसाय आणि रेव्ह पार्टीचा सडका प्रकार-
सूत्रांच्या माहितीनुसार, या रिसॉर्टमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्यांचे वारंवार आयोजन केले जाते. डान्स करणाऱ्या प्रत्येक युवतीसाठी एक खास कोड दिला जातो. पार्टीतील ग्राहक आपल्या पसंतीच्या युवतीस तो कोड असलेला टोकन देतो आणि त्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाते. पुढे त्या युवतीशी शारीरिक संबंध ठेवले जातात, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी-
अटक करण्यात आलेल्या संजय धापोडरकर याच्यावर याआधीही मालमत्तेशी संबंधित फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो कुख्यात गुंड रंजीत सफेलकर याचा निकटवर्तीय असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

पोलीस कारवाईमुळे खळबळ-
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईनंतर ग्रामीण परिसरातील इतर रिसॉर्ट्समध्ये सुरु असलेल्या अशाच अवैध धंद्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही बेकायदेशीर क्रियाकलापांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून योग्य ती कार्यवाही केली जाऊ शकते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.