Published On : Fri, Jun 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील त्रिमूर्ती नगरमधील ‘ओरियन स्पा’वर पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेट उघड, दोन युवतींची सुटका

Advertisement

नागपूर – नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरातील ‘ओरियन स्पा’च्या आड चालवल्या जात असलेल्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने भांडाफोड केला आहे. बुधवारी (२५ जून) सायंकाळी छापेमारी करत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून, प्रमुख दलाल तौसीफ शेख याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११.५५ वाजेपर्यंत पार पडली. राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुस्कान वर्षा अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील ‘ओरियन स्पा’मध्ये हा गैरप्रकार सुरू होता. मसाज सेंटरच्या नावाखाली हे रॅकेट राबवले जात होते.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छाप्यात भोलाशाह नगरमधील २६ वर्षीय तौसीफ करीम शेख याला अटक करण्यात आली असून, पार्वती उर्फ पिंकी थापा ही महिला त्याला अनैतिक धंद्याकरिता मदत करत असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ४,५०० रुपये रोख, दोन मोबाईल फोन, एक डीव्हीआर आणि इतर साहित्य मिळून एकूण ३७,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात IPC कलम १४३(२)(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी तौसीफ शेख याला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, संयुक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त राहुल माकणकर आणि सहाय्यक आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात पार पडली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement