नागपूर: अंबाझरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे गोकुळपेठ परिसरातील विला 55 कॅफेवर धाड टाकली. कॅफेमध्ये ग्राहकांना हुक्का पुरविल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.पोलीसांनी छापेमारीत हुक्क्याची भांडी आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्याव्यतिरिक्त विला 55 कॅफेचे मालक सोहेल सेठिया आणि कार्तिक येवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी पोलिसांना सोमवारी रात्री विला 55 कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पुरविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्यानंतर, कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकार्यांनी परिसरावर छापा टाकला आणि खरोखरच कॅफेत ग्राहकांना हुक्का पुरविला जात असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे आरोपींविरुद्ध कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलसांनी पुढील तपास सुरू केला आहे.