Published On : Tue, Jun 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ऑनलाइन लॉटरीच्या अवैध व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

Advertisement

नागपूर : शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरीच्या अवैध व्यवसायावर गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने मोठी कारवाई केली आहे. लालगंज येथील चकणा चौक परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागरिकांकडून पैसे घेऊन शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऑनलाइन लॉटरीवर सट्टा लावण्याचा व्यवसाय करत होते. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून चार संगणक, चार सीपीयू, सात गेमिंग मशीन, दोन स्लिप मशीन, दोन मोबाईल फोन, राऊटर, कीबोर्ड, कॅल्क्युलेटर तसेच इतर साहित्य असा सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख सचिन दिलीप रहागडाले आणि अनिकेत मोरेश्वर वाकळकर अशी आहे. तर सागर लीलाधर धनंजोडे हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Advertisement

या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.