Advertisement
नागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.या निवडणुका शांततेत आणि सुरळीत व्हाव्यात, यासाठी नागपूर पोलीसांनी शहरात पोलीस मार्च काढला. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या उपस्थितीत पोलीस मार्च काढण्यात आला.
मार्च सुरु होण्यापूर्वी त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून स्थानिक लोकांना पोलिसांनी या मार्च मागची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते.