Published On : Thu, Nov 1st, 2018

पोलीसांनी जनावरांचा ट्रक पकडुन ४१ गोरे , बैलाला दिले जीवनदान

Advertisement

कन्हान : – पोलिस स्टेशन च्या हदीत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ नागपूर शहर बॉयपास वरील गहुहिवरा (खंडाळा) पुलाचे वर जनावरांच्या एक ट्रकला थांबविले असताना कट मारून दोन्ही ट्रक पळाले असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करून गहुहिवरा पुला जवळ ट्रक (कनटेंर )ला पकडून कन्हान पोलीस स्टेशनला आणुन कार्यवाही करून ४२ गोरे – बैलालातील एका बैलाचा मुत्यु झाला . ४१ गोरे – बैलाला गौरक्षण पाठवुन जिवनदान दिले . या कार्यवाहीत १३ लाख ९५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

नागपूर ग्रामीण पोलीस विशेष पथकास मध्य प्रदेशातुन जनावरांची ट्रक भरून येत असल्याच्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीसांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ नागपूर शहर बॉयपास वरील गहुहिवरा (खंडाळा) पुलाजवळ गुरुवार (दि.१) नोव्हेंबर ला सकाळी १० वाजता दरम्यान जनावरांच्या ट्रकला थांबविले असता कट मारून दोन्ही ट्रक पळाले तेव्हा पोलीसांनी त्याचा पाठलाग करून दाहा चाकी ट्रक क्र. ए पी १२ – डब्ल्यू १३६७ मध्ये गाई- बैलाला निर्दयपणे ट्रक च्या आत गच्च भरून अवैधरीत्या नेताना पकडून दोन्ही ट्रकला कन्हान पोलीस स्टेशनला आणुन तीन आरोपींना अटक करून त्याच्या ताब्यातील ४२ गोरे – बैलाची अंदाजे किमत ३ लाख ९५ हजार रुपये , कनटेंर ट्रकची किंमत १० लाख रुपये,मोबाईल व नगद असा एकुण १३ लाख ९५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. एका बैलाचा मुत्यु झाला आहे .

यात आरोपी ट्रक चालक १) मुकेश सुरेश गायकवाङ वय ३४ वर्ष रा. गोधनी रेल्वे नागपूर २) फिरोज अब्दुल खालीद शेख वय २६ वर्ष रा.गोधनी रेल्वे नागपुर ३) ईश्वर शेषराव नागोसे वय ३० वर्ष रा. मोहाड़ ता. नरखेड या तिघांचे विरूध्द कलम पशु संरक्षण ११ (१) ड, ०५, ३४ भादंवि व १८४ मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा दाखल करून ४१ गोरे – बैलाला गौरक्षण लाखनी भंडारा येथे रवाना करून कन्हान पोलीसांनी ४१ गोरे – बैलाला जिवनदान दिले.

ही कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांचे नेतृत्वात शिपाई राजु गौतम, मंगेश सोनटक्के, विरेन्द्रसिह चौधरी , शैलेश बिनझाडे , मुकेश वाघाडे, आदीने मौलिक कामगिरी बजावली आणि ४१ गोरे – बैलाला जिवनदान दिले. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिक कौतुक करित आहेत.