Published On : Sat, Oct 23rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

पोलिस लाईन टाकळी, पेन्शन नगर येथे नेत्र व दंत तपासणी शिबिर

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी झोन अंतर्गत पोलिस लाईन टाकळी पेन्शन नगर येथे महापौर नेत्र तथा दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपसथित होते.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने ‘आझादी -७५’ अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये आरोग्य शिबीर ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी नागपूर महानगरपालिका आरोग्य यंत्रणा बळकट करीत आहे. सोबतच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना प्रत्येक आरोग्य सोयीचा लाभ मिळावा यासाठी शहरातील विविध भागात शिबीर आयोजित करण्यात येत आहे. महापौर नेत्र ज्योती योजना, महापौर दृष्टी सुधार योजना आदींच्या माध्यमातून गरजूंना महात्मे नेत्र पेढीच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रियेचा लाभ देण्यात येत आहे.

Advertisement

शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची बाह्य रोग तपासणी तसेच दंत तपासणी शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयाच्या चमूने केली. तपासणीनंतर आवश्यकता असणा-या व्यक्तींच्या दातांची सफाई, फिलिंग सुद्धा दंत महाविद्यालयाच्या चमूद्वारे करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, कॅन्सरच्या धोक्याबाबत तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात आली. दातांसाठी पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये करण्यात येतील. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आल्यानंतर आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

नेत्र तपासणी शिबिरामध्ये नेत्र तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांना पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली. याशिवाय नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना निःशुल्क औषध वितरण करण्यात आले.

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges