Published On : Thu, May 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील पोलीस हवालदाराच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Advertisement

नागपूर : शहरात राहणाऱ्या पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीचा तिच्या घरात शिरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारी पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून अश्लील कृत्य करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. त्याचा न्यायालयाने जामीनही फेटाळला. त्यामुळे त्याला अटक करण्याची तयारी नंदनवन पोलीस करीत असल्याची माहिती आहे.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप अकोला येथील खदान पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर आहे. या प्रकरणाने अकोला पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. नागपुरातील नंदनवन परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणीचे वडील देखील पोलीस खात्यात आहेत. तिच्या वडिलांची धनंजयशी मैत्री होती. त्यामुळे धनंजय नेहमी घरी ये-जा करत असे.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती. या ओळखीतून धनंजय सायरे याने मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.त्याने तिच्यावर शारीरिक संबंधांची मागणी करून जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठत नंदनवन पोलिसात धनंजय सायरे याचा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे विरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement