Published On : Wed, Jun 19th, 2019

दुचाकीचोरट्यास अटक करण्यात पोलिसांना यशप्राप्त

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील बालाजी लॉन मध्ये आयोजित लग्न समारंभात सहभागी होण्यास आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 30 एप्रिल 2019 ला रात्री 10 दरम्यान घडली होती

यासंदर्भात फिर्यादी चंदू खेमु खरपा वय 32 वर्षे रा कळमना नागपूर ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावोरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा नोंदवीत तपासाला दिलेल्या गतीवरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या दुचाकी चोरट्याचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले असून अटक आरोपी चे नाव अनिकेत जगदीश बदोडे वय 18 वर्षे रा कुंभारपुरा बगडगंज नन्दनवन नागपूर असे आहे.या आरोपीकडून चोरीस गेलेली लाल रंगाची पॅशन प्लस दुचाकी क्र एम एच 31 के आर 2900 हस्तगत करण्यात आली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, पोलीस निरीक्षक पाल यांच्या मार्गदर्शनात डी बी पथक चे दिलीप कुंमरे, रुपेश, कृष्णा, राहुल ठाकूर आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.