Published On : Wed, Sep 18th, 2019

नवीन कामठी पोलिसांनी दिले 5 गायींना जीवनदान

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गे 5 गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या वाहनावर नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून वाहन ताब्यात घेत वाहनातील 5 गोवंश जनावरांना सुरक्षित ताब्यात घेण्याची कारवाही रात्री दीड वाजेदरम्यान केली मात्र आरोपी अज्ञात वाहनचालकाने वेळीच संधी साधुन पळ काढण्यात यश गाठले.या कारवाहितुन जप्त 5 गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आले तसेच अज्ञात पसार आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला.

या कारवाहितुन जप्त 5 गाई किमती 60 हजार रुपये व जप्त वाहन क्र एम एच 31 इ ए 5295 किमती अडीच लक्ष रुपये असा एकूण 3 लक्ष 10 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डिसीपी निलोत्पल, एसीपी राजरतन बन्सोड,पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर,गणेश मुंडे, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश यादव,मंगेश लांजेवार,राजा टाकळीकर, सतीश ठाकूर, सुधीर कनोजिया, अनिकेत सांगळे, संदीप गुप्ता, मंगेश सरपाते आदींनी केली असून पुढिल तपास सुरू आहे.

.. Sandeep Kamble