नागपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर येथील अलंकार सभागृहाजवळ पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, अमलदार,महिला, लहान बालके तसेच स्वयंसेवी संघटनेतील युवकी सहभागी झाले होते.
तसेच रोपे जगविण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला.दरवर्षी 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिनानिमित्त झाडे आणि वनस्पतींचे संवर्धन आणि त्याचे महत्त्व याचा प्रचार केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे. प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणीय प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो.मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे.
प्रदूषण रोखणे,स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात.संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला हा दिवस जागतिक पातळीवर पर्यावरणा विषयी जागरूकता आणण्यासाठी साजरा केला जातो. याची सुरुवात 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 5 जून ते 16 जून या कालावधीत आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत केली. तेव्हापासूनच जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो.