Published On : Thu, Mar 15th, 2018

पं.बच्छराजजी व्यास पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे विनम अभिवादन

नागपूर: ध्येय साधना अमर रहे, या उक्तीप्रमाणे आपले सर्वस्वी जीवन जनतेसाठी समर्पित करणारे महान व्यक्तिमत्व, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक, शीघ्र कवी तथा लेखक, शिक्षण, धर्म, न्याय इ.मध्ये निपुण राजनीतीज्ञ, भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष व माजी विधान परिषद सदस्य स्व.पंडित बच्छराजजी व्यास यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक पंडित बच्छराज व्यास चौक स्थित पुतळयाला मा.महापौर श्रीमती नंदा जिचकार व उपमहापौर श्री.दीपराज पार्डीकर यांनी नगरीच्या वतीने माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेविका श्रध्दा पाठक, वंदना यंगटवार, नेहा वाघमारे, माजी नगरसेवक प्रा.प्रमोद पेंडके, मुन्ना आदीवान, माजी नगरसेविका रश्मी फडणवीस, पं.बच्छराज व्यास प्रतीष्ठानचे अॅड.कैलासचंद्र व्यास, अॅड.नचिकेत व्यास, दाधीच समाजाचे ओमजी आचार्य, महेशदत्त भाबडा, सुनील शर्मा, श्रीकांत दाधीच, नंदकिशोर शर्मा, अनुराग तिवारी, पवन तिवारी, महावीर जोपट, मनोज तिवारी, राजेश शर्मा, सनत जैन, गुडडु टक्कामोरे, डॉ. महेश तिवारी, भाजपाचे विलास (गुडडु) त्रिवेदी, सुबोध आचार्य, ‍ शिवाजी शिरसाठ, श्याम चांदेकर, दशरथ मस्के, अनिल मानापूरे, आशीष भुते, पप्पु नाकाडे, जितेन्द्र नागपूरकर, नाना वडयाळकर, कविता इंगळे, अनिता काशीकर, वैशाली गायकवाड, निरंजना पाटील, सरोज पेशकर, जगदीश गुप्ता, म.न.पा.चे सहा.आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थीत होते.