
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात आले होते. मोदी यांच्या सभांमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये वाढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच करू असेही सांगितले. मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून भाजपशी जवळीक वाढली असल्याचे ते म्हणाले.
राज ठाकरे असे पहिले व्यक्ती आहे की ज्यांनी मोदी पंतप्रधान झाले पाहिजे, अशी जाहीर भूमिका घेतली होती.
दहा वर्षांत ज्या प्रमाणे विकास होत आहे ते पाहून राज ठाकरे यांनीही मोदीजींच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे मान्य केले असेल. राज ठाकरे यांची मनसे महायुतीसोबत राहील, असा विश्वास असल्याचेही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे महायुतीत सामील होणार का ? हे पाहावे लागेल.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में करोड़ों की Cyber Fraud Gang का भंडाफोड़ #NagpurNews #CyberCrime #BankFraud...
शराब पार्टी के बाद Murder? नागपुर में युवक की पत्थर से हत्या...
पार्सल देने के बहाने बुजुर्ग की सोने की चेन लूटी! #NagpurNews #ChainSnatching...
30.60 लाख का मुद्देमाल जब्त ; दो अलग-अलग कार्रवाई में एमडी ड्रग्स...
आधी रात घर में घुसा जहरीला मण्यार (Krait) सांप! #NagpurNews #SnakeRescue #Manyar...




