Advertisement
नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी एक खास गिफ्ट दिले आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज महिला दिन आहे.
त्यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला सलाम करतो.
तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे म्हणत मोदींनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.