Published On : Thu, Apr 13th, 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 14 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता आगमन

· दीक्षाभूमी सकाळी 11.00 वाजता
· कोराडी थर्मल पॉवर स्टेशन सकाळी 11.45 वाजता
· डिजीधन मेळावा समारोह 12.25 वाजता


नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या शुक्रवार, दिनांक 14 एप्रिल रोजी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने सकाळी 10.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. विमानतळावर स्वागताचा स्वीकार केल्यानंतर दीक्षाभूमीसाठी प्रयाण करतील.

दीक्षाभूमी येथे सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष समारोहास उपस्थित राहतील. तसेच पवित्र दीक्षाभूमी स्तूपास भेट देऊन आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर ते कोराडी थर्मल पॉवर स्टेशनकडे रवाना होतील. सकाळी 11.45 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे उद्घाटन समारोहाप्रसंगी उपस्थित राहतील.

दुपारी 12.25 वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. यावेळी डिजीधन मेळावाचा समारोप होईल. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ हे विशेष टपाल तिकीट पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येईल. प्रधान मंत्री उपस्थित जनसमुदयाला मार्गदर्शन करतील. दुपारी 1.45 वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून विमानतळाकडे प्रयाण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी 2.10 वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीसाठी प्रयाण करतील.