Published On : Wed, May 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान मोदींकडून मेलोनींना ‘मेलोडी’ गिफ्ट; सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा

Advertisement

रोम : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची मैत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. इटली दौऱ्यावर असताना मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ चॉकलेट भेट दिले. या खास भेटीनंतर दोन्ही नेत्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

मेलोनी यांनी स्वतः हा व्हिडिओ एक्सवर शेअर करत “थँक यू फॉर द गिफ्ट” अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर “मेलोडी” या नावाची सोशल मीडियावर पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली. याआधीही मोदी आणि मेलोनी यांच्या नावांचा संगम करत तयार झालेला “मेलोडी” मीम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता.

Gold Rate
Aug 25 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,100 /-
Gold 22 KT ₹ 1,50,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान मोदी यांनी भारतीय कंपनी Parle Products ची प्रसिद्ध Melody टॉफी मेलोनी यांना भेट म्हणून दिली. भारतीय बाजारात लोकप्रिय असलेल्या या टॉफीमुळे भेट अधिक खास ठरल्याची चर्चा आहे.

रोम दौऱ्यादरम्यान मोदी आणि मेलोनी यांनी ऐतिहासिक Colosseum येथे भेट देत काही वेळ एकत्र घालवला. यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

भारत-इटली संबंध सध्या नव्या उंचीवर पोहोचत असून व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges