Published On : Thu, Jul 6th, 2017

‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण

Advertisement

Tree Plantetion Photo 06 July 2017 (2)
नागपूर: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे १ ते ७ जुलैदरम्यान ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवारी उपमहापौर दीपराज पार्डीकर, परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्यासह झोन सभापती, नगरसेवक आणि नागरिकांनी शहरातील निरनिराळ्या भागात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

आशीनगर झोनअंतर्गत यादवनगर येथील ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपमहापौर दीपराज पार्डीकर, आसीनगर झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका वंदना चांदेकर, नगरसेविका वैशाली नारनवरे, नगरसेवक इब्राहिम टेलर, प्रमोद शेंडे, हर्षवर्धन डोंगरे, राहूल बोरकर, नरेंद्र बावनगडे, सहायक आयुक्त विजय हुमने उपस्थित होते. उपमहापौरांसह सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावावे, असे आवाहन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.

मंगळवारी झोनअंतर्गत शिलानगर उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका गार्गी चोप्रा, सहायक आयुक्त हरिश राऊत, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, माजी नगरसेविका शिला मोहोड, उद्यान निरीक्षक अनंत नागमोते, राजीव वाधवा, जमिला बी, चेतना शर्मा, नंदा बिरे, सीमा गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी उद्यान परिसरात उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण केले.

Advertisement

नेहरूनगर झोन अंतर्गत जिव्हाळा फाउंडेशनच्या सहकार्याने पाचव्या दिवशी ईश्वर नगर, रमना मारोती रोड, शिव मंदिर येथे वृक्षारोपण करून शहरातील विविध भागात वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे उपस्थित होते. नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकोरे, नगरसेवक पिंटू झलके, राज्य महिला आयोग सदस्य नीता ठाकरे, डॉ. गादेवार, विजय आसोले, किशोर पेठे, महेन्द्र फरकाडे, किरण दातीर, अमर टिचकुले, विकास बाबरे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण केले. यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, उपाध्यक्ष राजू तितरे,चंद्रकांत धांडे, चंद्रशेखर देहनकर, सचिव तुषार महाजन, सहसचिव विनोद कोटांगले, चेतन मुटकुरे, मंगेश पगारे, कोषाध्यक्ष अक्षय ठाकरे, कार्यालयप्रमुख निखिल दुपारे, राहुल नाक्षिणे,विकास ठवकर, अक्षय झाडे, गौरव चौधरी, दीपक कारेमोरे, आशीष येळणे आदी उपस्थित होते. नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकोरे यांनी आपल्या निधीतून ट्रीगार्ड उपलब्ध करुन दिले.

Advertisement
Advertisement

मनपा आणि कामगार कल्याण मंडळ चिटणीस नगरच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला नगरसेवक विजय (पिंटु) झलके, कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे, मुकुंद मुळे, मोहाडीकर, मेश्राम, गायकवाड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement