नागपूर: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे १ जुलै ते ७ जुलै दरम्यान शहरात सुरू असलेल्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाअंतर्गत हनुमाननगर झोन मधील सच्चिदानंद नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक दीपक चौधरी, नगरसेविका कल्पना कुंभलकर, नगरसेविका रूपाली ठाकूर, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, उद्यान अधीक्षक सुधीर माटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी झोन सभापती भगवान मेंढे यांनी झोन अंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला. नागरिकांनी या अभियानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला वसुंधरा कोलते, पुष्पा राऊत, हनुमाननगर झोनचे उपअभियंता (लोककर्म) कृष्णकुमार हेडाऊ, आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी दिनेश कलोडे आदी उपस्थित होते.
राजेंद्र नगर येथे वृक्षारोपण
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या राजेंद्रनगर येथील खुल्या जागेत नगरसेविका उज्ज्वला बनकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वसंतराव बनकर, श्रीकांत आंबुलकर, राहुल मेश्राम, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी वृक्षारोपण केले.
वाल्मिकीनगर शाळेत आमदार देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण
गांधीनगर येथील वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा येथे आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते. या सर्व मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले. वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडत असल्याचे प्रतिपादन आ. सुधाकर देशमुख यांनी केले.