नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील पिट्टू स्पर्धेमध्ये पिट्टू असोसिएशने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. पुरुष आणि महिला गटात अंतिम सामन्याम पिट्टू असोसिएशन नागपूर संघाने प्रतिस्पर्धींना मात देत विजेतेपद प्राप्त केले. वैशाली नगर मैदानात ही स्पर्धा पार पडली.
पुरुष गटात पिट्टू असोसिएशन नागपूर चा सामना नागपूर वॉरियर संघासोबतच झाला. यामध्ये पिट्टू असोसिएशनने सर्वाधिक ५३ गुण मिळवून ११ गुणांनी विजेतेपदावर मोहोर उमटविली. ४२ गुणांसह नागपूर वॉरियरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पीडब्ल्यूएस कॉलेज (४२) ने जी.एच. रायसोनी ज्यूनिअर कॉलेज (३८)चा ४ गुणांनी पराभव केला.
महिलांच्या सामन्यात पिट्टू असोसिएशन नागपूर संघाने ६ गुणांनी पीडब्ल्यूएस कॉलेजचा पराभव केला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात रायसोनी कॉलेज (४६) संघाचा १२ गुणांनी पराभव करुन वैशाली नगर पिट्टू क्लब (५८)ने विजय मिळविला.
१७ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रायसोनी ग्रुप (५८) ने वैशाली नगर पिट्टू क्लब (५५)चा अवघ्या ३ गुणांनी पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात डी.डी. नगर विद्यालयाने (२७) शिवाजी वॉरियर्स (१८) चा ९ गुणांनी पराभव करुन विजय मिळविला. १७ वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना चंदा देवी सराफ स्कूल विरुद्ध सेंट झेव्हियर्स हायस्कूल यांच्यात झाला. यात चंदा देवी सराफ स्कूलने १६ गुणांनी (४४-२८) विजय मिळविला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात माउंट कार्मेल स्कूल (४८)ने डीडी नगर विद्यालयाचा (३७) ११ गुणांनी पराभव केला.
विजेत्यांना माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक संदेश खरे, चेतराम हारोडे, सोनाली मोकासे, रीना चौबे, हरीश चौबे आदी उपस्थित होते.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





