बावनकुळेंचा प्रत्येक शनिवार व रविवारी जनता दरबार

नागपूर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेण्याचे ठरविले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते २ या दरम्यान कोराडी येथील कार्यालयात ते नागरिकांना भेटणार आहेत.

नागपूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना या जनता दरबारात उपस्थित राहून त्यांच्या समस्या मांडता येतील.

मागील १५ वर्षांतील आमदारकी व अलिकडील ५ वर्षांतील मंत्री पदाच्या कार्यकाळाचा प्रशासकीय अनुभव लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य आहे. असे बावनकुळे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.