Published On : Tue, Jun 29th, 2021

‘पीपल टू पीपल’ संस्थेने दिला निराधारांना आधार

Advertisement

नागपुर – कोरोना काळात लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर लोकांचे जीवन अतिशय हालाखीचे, अडचणीच निर्माण झाल्या. रोजंदारी ने काम करणाऱ्यांचे रोजगार हरवले आणि आर्थिक टंचाई निर्माण झाली. अन्नधान्य घेण्याकरिता पण पुरेसे पैसे नाहीत अशा पार्श्वभूमीवर “पीपल टू पीपल यासंस्थेने कामठी येथील रमानगर या झोपडपट्टीत आर्थिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या 28 कुटुंबांना नुकतेच अन्नधान्य किट वितरीत केले. ज्यामध्ये प्रामुख्याने मुलं नसलेले वयोवृद्ध माता-पिता, उत्पन्नाचं साधन नसलेले विधूर विधवा, नोकरी सुटलेले, ज्यांचे कडे अजिबात काम नाही अशांचा समावेश करण्यात आला.

या अन्नधान्य किटमध्ये तूर डाळ, मुंग डाळ, मटकी, मीठ पॅकेट, पोहे, रवा, खाद्यतेल, मास्क, सॅनिटायझर बॉटल, बेसन, सोयाबीन वडी, हळद पॅकेट, मिरची पावडर, चहा पत्ती , साखर, मुलांकरिता बिस्किटे, आंघोळीचे साबुन, वॉशिंग पावडर इत्यादींचा समावेश आहे.

संस्थेतर्फे नागपूर मध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाच्या बिकट स्थितीत अनेकांना इलेक्ट्रिक बिल भरण्याकरीता आर्थिक मदत देणे, गरिबांना जेवण देणे, आजार यांकरिता फळे पोहचवणे, गरिबान करिता मोफत ॲम्बुलन्सची व्यवस्था करणे, गरीब रुग्णांना औषधांसाठी आर्थिक मदत करणे इत्यादी कामे अतिशय हिरिरीने भाग घेऊन पार पाडली.

त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना संस्थेची चांगलीच मदत झाली. लॉकडाऊन संपल्यानंतर आवश्यक रोजगार प्राप्त न झाल्यामुळे किराणा खरेदी करनेही कठीण झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून संस्थेद्वारा एकूण 500 कुटुंबाकरिता अन्नधान्य किटचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक धम्मचारी तेजधम्मा आणि अनुश्री खोब्रागडे यांनी दिली. याप्रसंगी धम्मचारी तेजधम्म, पियुष नंदेश्वर, भिमटे, विकी पोटपोसे, कपिल आणि
पद्मकार यांनी वितरणा करिता मदत केली.