Published On : Tue, Apr 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

गोरखपूर-मुंबई विमानप्रवासात प्रवाशाचा मृत्यू; नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग, प्रवाशांचा संताप

Advertisement

नागपूर -गोरखपूरहून मुंबईकडे निघालेल्या SpiceJetच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका ६० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. सुमन कुमार चौधरी (रा. गोरखपूर) असे मृत प्रवाशाचे नाव असून ते आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होते.

सोमवारी रात्री सुमारे ८ वाजून ४ मिनिटांनी उड्डाण केलेल्या एसजी-५५५ या विमानात ही घटना घडली. सीट क्रमांक बी-६ वर बसलेल्या चौधरी यांची अचानक तब्येत बिघडली. काही क्षणांतच ते बेशुद्ध पडल्याने विमानात एकच खळबळ उडाली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तातडीने विमान नागपूरकडे वळवण्याचा निर्णय घेतला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रात्री सुमारे १० वाजता विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. दरम्यान, आधीच सज्ज असलेल्या KIMS-Kingsway Hospitalच्या आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तत्काळ तपासणी केली. मात्र, लँडिंगपूर्वीच प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला, जिथे डॉक्टरांनी मृत्यूची अधिकृत पुष्टी केली.

या घटनेनंतर विमानातील १६२ प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे विमान वळवण्यात आले असले तरी, जवळपास तीन तास प्रवाशांना विमानातच थांबवून ठेवण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. या काळात पिण्याचे पाणी किंवा इतर मूलभूत सुविधा न दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला. परिणामी, प्रवाशांनी विमानातच संताप व्यक्त करत गोंधळ घातल्याचेही समोर आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.