
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रस्तावित ‘रामरक्षा’ आंदोलनावर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जोरदार टीका केली आहे. “हे रामरक्षा आंदोलन नसून पक्षरक्षा आंदोलन आहे,” असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
फुके म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना रामाची आठवण उशिरा झाली. 2019 मध्येच त्यांनी प्रभू श्रीरामांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले असते, तर आज पक्षावर ही वेळ आली नसती. हिंदुत्व सोडल्यामुळेच त्यांचे कार्यकर्ते आणि जनाधार दूर गेला.”
नागपूरच्या रामनगर येथील श्रीराम मंदिरात आंदोलन करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या मंदिराचे आजीवन सदस्य आहेत. उद्धव ठाकरे हे आंदोलनासाठी नाही, तर फडणवीसांची मनधरणी करण्यासाठी नागपुरात यावे,” असा उपरोधिक टोला फुके यांनी लगावला.
विदर्भाची निवडही राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप करत फुके म्हणाले, “नौटंकी करून कोणताही पक्ष मोठा होत नाही. उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे. हे आंदोलन रामरक्षेसाठी नसून स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी आहे.
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...
मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime
मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर
वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...
नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...
रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra




