नागपूर : शहरातील वाडी परिसरात असलेल्या शुभम नगर पालकर ले आऊट येथे असलेल्या एका घरी बॉम्ब असल्याची माहिती समोर आली.धनीराम नाईक यांच्या घरी शुजच्या डब्ब्यात बॅाम्बसदृश्य वस्तू दिसल्याने परिसरात खळबळ उडाली.यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी केलेल्या तपासात ती वस्तू बॉम्ब नसल्याचे समोर आले. मुलाच्या शाळेच्या प्रोजेक्टला पालकांनी बॉम्ब समजले.नाईक यांचा मुलगा दहावीत असून त्याने एक प्रोजेक्ट तयार केला होता.बुट घातल्यानंतर लाईट कसा लागतो हे त्याला बघायचे होते.
त्याकरिता त्याने बुटामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तूंच्या माध्यमातू प्रोजेक्ट तयार केला. मात्र त्याच्या पालकांना बॉम्ब असल्याचा गैरसमज झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान नाईक यांच्या घरी शुजच्या डब्ब्यात बॅाम्बसदृश्य वस्तू आढळल्याने स्थानिकांमध्ये भीती पसरली होती. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
‘नागपूर टुडे’शी बोलताना डीसीपी, झोन ०१ चे लोहित मतानी यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. हा बॉम्ब आहे अथवा नाही याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र शेवटी हे वस्तू बॉम्ब नसल्याचे समोर आले.