Published On : Thu, Apr 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

तुषार ठावरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोई सेवा

Advertisement

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त जोपासली सामाजिक जाणीव

नागपूर : भारतीय जनता पार्टी लक्ष्मीनगर परिसरातील कार्यकर्ता, पदाधिकारी तुषार ठावरे यांचे दुर्दैवाने कोरोनामध्ये निधन झाले. ते रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये लक्ष्मीनगर पिझ्झा हटपुढे नियमितपणे अनेक वर्ष ताक वितरण करीत होते. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त तुषार ठावरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच ठिकाणी पाणपोईची सेवा सुरू करण्यात आली.

माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून निःश्वार्थ समर्पण भावनेने पक्षाची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला सामजिक जाणीव जोपासून श्रद्धांजली वाहण्यात आली.

बुधवारी (ता.६) लक्ष्मीनगर येथील पिझ्झा हट पाणपोईचा शुभारंभ झाला. भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांद्वारे पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या कार्याचा हा सन्मान प्रत्येक सदस्याला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी माजी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Advertisement

यावेळी माजी महापौर संदीपजी जोशी, प्रभाग ४० चे संयोजक श्री विवेक तरासे, माजी नगरसेवक गोपाल बोहरे, महेंद्र भुगांवकर, मनोज देशपांडे, शंतनू येरपूडे, राजेंद्र मुंडले, दीपक वानखेडे , मंगेश उपासनी, राजू कुलकर्णी, जयंता आदमने, अजय डागा, कौस्तुभ खांडेकर, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, राजीव रोडी, चैतन्य दवंडे, प्रकाश चांद्रायन, शंतनू मोहोड, कृष्णा काकडे, सुनील कलंत्री अमित कुथे धीरज लिकुरवाडे उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.