| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 20th, 2017

  रसिकांसाठी पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाची भेट

  नागपुर: कविवर्य सुरेश भट सभागृह लोकार्पण सोहळ्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रसिकांना पहिलावहिला सांस्कृतिक नजराणा गायिका पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाच्या रूपाने मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी ७ वाजता ‘केव्हा तरी पहाटे…’

  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या काव्य आणि गझल गायनाचा तसेच त्यांच्या खास पत्रांचा स्मृतिगंध गायिका पद्‌मजा फेणाणी-जोगळेकर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडतील. सदर कार्यक्रमासाठी समोरच्या रांगेतील १०० खुर्च्या राखीव राहतील.

  नागपूरकर रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145