| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 25th, 2018

  स्टॅम्प ड्युटीत १ टक्क वाढ केल्याने मुंबईत घरांच्या किमती कडाडणार

  मुंबई: सरकारने स्टँप ड्युटी वाढवून मुंबईत आधीच गगनाला भिडलेल्या घरांच्या किंमतीत वाढ केल्याने हा आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार असून आता घरासाठी इच्छुक सामान्यांचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी अधिक निधी उभारण्यासाठी स्टँप ड्युटीत एक टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती आणखी कडाडणार आहे.

  मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (एमएमसी) कायद्यात बदल करण्यासाठी एका नवीन कायद्याचा मसुदा विधानसभेत नुकताच उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार मालमत्तेवर १ टक्का स्टॅम्प ड्युटी जादा आकारण्यात यावी आणि पालिकेला ज्यादा आकारलेल्या निधीच्या तुलनेत समान निधी देण्यात यावा असे नमदू करण्यात आले होते.

  नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल अध्यक्ष- राजन बांदेलकर म्हणाले, रिअल इस्टेटचा उद्योग सध्या संकटात आहे. त्यात १ टक्का स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ म्हणजे रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यासारखेच आहे.

  निर्मल लाईफस्टाईल संचालक, राजीव जैन, मुंबईत मोठमोठे व्यावसायिक प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत असताना सरकारच्या या निर्णयामुळे हे उद्योजक आपले पाऊल माघारी घेण्याची शक्यता आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145