Published On : Thu, Nov 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

श्रीकृष्णांवरील वक्तव्याने नागपुरात संताप; बागेश्वर बाबांविरोधात सीताबर्डी पोलिसांत तक्रार

धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईची मागणी; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
Advertisement

श्रीकृष्णांवरील वक्तव्याने नागपुरात संताप; बागेश्वर बाबांविरोधात सीताबर्डी पोलिसांत तक्रार

नागपूर : भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता नागपुरातही उमटले आहेत. बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. अक्षय सुभाष समर्थ यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रीकृष्ण भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित वक्तव्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथे आयोजित श्रीराम कथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत टिप्पणी केली होती. ‘हमारे राम सीधे हैं, तुम्हारे कृष्ण टेढ़े हैं’ असे वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय श्रीकृष्ण यांचे रूप, देहबोली, बासरीवादन आणि दिव्य लीलांबाबतही तुलनात्मक टिप्पणी केल्याचे नमूद आहे.

या वक्तव्यांमुळे कोट्यवधी श्रीकृष्ण भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे अ‍ॅड. समर्थ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज मिळवून वक्तव्यांचा संदर्भ आणि परिस्थितीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही पोलिसांकडे करण्यात आली आहे. तक्रार दाखल करताना अनेक नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.