Published On : Tue, Jan 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आमचे सरकार स्थिर ते आजही आहे उद्याही राहणार; देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात विधान !

Advertisement

नागपूर : राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संत जगनाडे महाराज पुण्यातिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आमदार अपात्रेतेप्रकरणी फडणवीस यांनी भाष्य केले. आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थीर असून सरकार कालही स्थीर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.