Published On : Sat, Jun 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महायुती सरकारला महाराष्ट्रातून हाकलून लावणे हेच आमचे ध्येय; नाना पटोलेंचे विधान

Advertisement

गोंदिया :लोकसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला धडा शिकविला. या सरकारने ज्या प्रकारे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरुण, बेरोजगारांचा ज्या प्रकारे छळ केला, गरिबांच्या हातातील काम हिसकावून घेतले, ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची वाताहात सुरू आहे, त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि या भ्रष्टाचारी, जनविरोधी, असंवैधानिक महायुती सरकारला राज्यातून हाकलून लावणे, हेच आमचे ध्येय आहे,

असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी मध्यरात्री गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना भाजपचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी आमदार रमेश कुथे यांच्या भेटीला आले होते.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

राज्यातील भाजप प्रणित महायुती सरकार ही महाराष्ट्र विरोधी आहे आणि म्हणून या महाराष्ट्र विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे आणि पुढे त्याकरिता धोरण आखून त्याची लोकसभेप्रमाणेच विधानसभेत ही अंमलबजावणी करणे हे आमचे प्राथमिक लक्ष आहे, असेही पटोले म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.