वर्धा – सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या बालरोग विभागाद्वारे जागतिक ओआरएस दिनानिमित्त रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी जनजागृतीपर संवाद साधण्यात आला. यावेळी रुग्णालयात ओआरएस अर्थात ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजेच क्षार संजीवनीचे महत्त्व सांगणारे विविध उपक्रमही राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ‘जादूई मिश्रणाबाबत करा जागरूकता निर्माण’ या संकल्पनेवर आधारित निर्जलीकरण आणि ओआरएसच्या योग्य वापराविषयी रुग्णालयातील बालरुग्ण भरती विभागात पालकांना बालरोग विभाग प्रमुख डॉ. अमर ताकसांडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल लोहकरे आणि पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. केतकी गिरडकर यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तर, बालरोग विभागाबाहेरील रूग्ण व अभ्यागतांना डॉ. कृपा भानुशाली, डॉ. कुशल देसाई, डॉ. आशिता मलिक, डॉ. हर्षा दमाम आणि डॉ. वेदांत अग्रवाल यांनी अतिसार, निर्जलीकरणाची लक्षणे आणि ओआरएसचे महत्त्व याबाबत प्रात्यक्षिकासह समुपदेशन केले. यावेळी निर्जलीकरण झालेल्या रूग्णांना ओआरएस पावडरच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
याशिवाय, बालरोग विभागांतर्गत डॉ. साईप्रिया या विद्यार्थिनीने निर्जलीकरणाची लक्षणे आणि व्यवस्थापन या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण केले. यावेळी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. अमर ताकसांडे, डॉ. साईप्रिया आणि डॉ. शिखा कक्कत यांनी ओआरएस प्रश्नमंजूषा घेतली. या स्पर्धेत ऋषिकेश मावळे आणि ऋषिका मोरे यांनी सादर केलेल्या प्रश्नमंजूषेमध्ये २०२०ची बॅच प्रथम आली.
या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनात सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. रेवत मेश्राम, डॉ. महावीर लाक्रा, डॉ. जयंत वाघ, डॉ. आशिष वर्मा, डॉ. शाम लोहिया, डॉ. सारिका गायकवाड, डॉ. केता वाघ, डॉ. अभिराज पारेकर, डॉ. दिनेश हिंगे, डॉ. अजिंक्य वासूरकर, डॉ. प्रशांत हिंगे, डॉ. शैलेश वांदिले, डॉ. जयश्री टेंभुर्णे, डॉ. अर्जुन जयस्वाल, रुग्णालय सल्लागार योहाना शेख यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.