Published On : Thu, Jan 4th, 2018

बी.एल.एस-बेसिक लाईफ सपोर्ट मूलभूत जीवन प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळा चे आयोजन

Advertisement


नागपुर: सर्वदूर विकास होत असतांना, शहर मोठे होत असतांना प्रत्येकाचे नोकरी-व्यवसाय- रोजगार निमित्ताने भरपूर वेळ घरापासून दूर जाणे आणि रहाणे ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आजची ही परिस्थिती सर्वांसाठी लागू आहे मग तो श्रीमंत असो वा गरीब. अश्या स्थितीत फक्त जीवनाचीच नव्हे तर रस्त्यावरच्या वाहनाची गती देखील वाढलेली आहेच. एकूण काय तर अनोळखी ठिकाणी होणारे अपघात प्रचंड प्रमाणात वाढले. असे अपघात अनेक प्रकारचे असतात आणि अशा वेळी अवती-भवती असणारे नागरिकांनी तातडीने अॅम्बुलेंस ला कळविणे जसे गरजेचे तसेच ती येईल तोपर्यंत विशिष्ट प्रथम-उपचार माहित असणे सुद्धा फार गरजेचे आहे. जसे, अचानक हृदयाघात ( म्ह.हार्ट अटॅक) झाल्यामुळे पडलेला व्यक्ती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येतो तेव्हा प्राण वाचविण्यासाठी कोण्याही माणसा कडून सी पी आर- कार्डीओ पल्मोनरी रीससीटेशन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते. असे लक्षात आले आहे कि जरी ७० टक्के हृदयाघात घरीच येतात, तरी सुद्धा फक्त ५०-५५ टक्के लोकांनाच त्वरित मदत मिळते.

इस्पितळाच्या बाहेर हृदयाघात आल्यास आणि सी पी आर न मिळाल्यास ९० टक्के शक्यता प्राण जाण्याची असल्याचे, एका शोध-अध्ययनाने दाखविले आहे. जर पाहिल्या काही मिनिटातच सी पी आर मिळाले तर प्राण वाचण्याची शक्यता दुपटीने किंवा तिपटीने बळावते हेहि लक्षात आले आहे. सी पी आर- कार्डीओ पल्मोनरी रीससीटेशन, हे एक असे कौशल्य आहे कि ज्यात कृत्रिम श्वास व हृदयाच्या मसाजने रक्ताचे अभिसरण तसेच पुरवठा नियमित सुरु राहण्याची प्रक्रिया पुन्हा चालू होऊन हृदयाघात झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचतात. थोडक्यात सांगायचे तर, सी पी आर म्हणजे कृत्रिम श्वास व हृदयाच्या मसाजने व्यक्तीला पुनर्जीवन देण्याचे एक महान कार्य आहे. दिनांक २-जानेवारी- २०१८ ला सकाळी ८ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत बी.एल.एस.कार्यशाळा आयोजित केली गेली या कार्यशाळेचे उद्घाटन नागपुरच्या माननीया महापौर नंदा जिचकार यांच्या शुभ हस्ते झाले.

स्वागताच्या औपचारिकते नंतर, बी.एल.एस. च्या मुख्य संयोजिका डॉ. मीनाक्षी गिरीश यांनी संपूर्ण तंत्र सर्वांना विडीयो च्या माध्यमाने विशद केले व प्रात्यक्षिक दाखविले. या प्रसंगी उत्तमरीत्या प्रशिक्षण घेतलेल्यांचे आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्वयंसेवी संगठना एच.ई.आर.डी. आणि एल.एस.टी.एस. च्या निदेशक डॉ. सूचिका देशमुख यांनी या तंत्राचे महत्व सोप्या शब्दात उपस्थितांना सांगितले. या दोनी स्वयंसेवी संघटने मार्फत बी.एल.एस. करिता संपूर्ण चमू प्रस्तुत उपक्रमास लाभली होती, हे विशेष. केंद्रीय भारतीय बालरोग अकादमी चे अध्यक्ष डॉ. संतोष सोहन यांनी सर्व विद्यार्थ्यांना हे तंत्र शिकण्याचे कौतुक केले आणि प्रसंगी एक तरी जीव वाचवा असे आव्हान केले.


आपल्या उद्घाटन भाषणात माननीया महापौर नंदा जिचकार म्हणाल्या कि ५५ व्या राष्ट्रीय बालरोग परिषदेचे नागपुरात आयोजन आपल्या शहराकरिता अत्यंत भूषणावह घटना आहे. त्यांनी सर्व सहभागी झालेल्यांचे कौतूक केले व या उपक्रमाला एक “सामाजिक शिक्षण” अशी समर्पक उपमा दिली. सर्व डॉ. ची टीम सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत कि ज्यांनी संपूर्ण समाजाकरिता आवश्यक उपक्रमाचे आयोजन शाळकरी तसेच महाविद्यालयीन विध्यार्थ्यान करिता केले. या वेळी त्यांनी सर्वांकडून आयुष्यभर या तंत्राचे उपयोग गरजू व्यक्तीकरिता करण्याची शपथ सुद्धा म्हणवून घेतली. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना स्वच्छता सर्वेक्षण, त्याची माहिती आणि महत्व तसेच स्वच्छता एप डाउनलोड करून वापरण्याचे आव्हान देखील केले. स्वच्छ-घर, स्वस्थ-घर तसेच स्वच्छ-नागपूर, स्वस्थ-नागपूर देखील सर्वांची सामुहिक जवाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

या प्रसंगी त्यांनी स्वतः या तंत्राचे प्रयोग सर्वांसमक्ष करून बघितले, हे अत्यंत विशेष. नागपूरच्या शाळा आणि महाविद्यालयांनी प्रस्तुत कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद दिला आणि ३,००० च्या वर संख्येत जीवनरक्षक प्रथमोपचार बेसिक लाईफ सपोर्ट कौशल्य उपक्रमात सर्वांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यात आले. प्रस्तुत उपक्रमास सुमारे ३०० मूक-बधीर विध्यार्थी देखील सहभागी झाले हे अत्यंत विशेष. त्यांचे सोबत संभाषणा करिता शाळेनी विशेष भाषा शिक्षिका पाठविली होती. संपूर्ण प्रशिक्षण उपक्रम डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ.प्रवीण डाहाके आणि डॉ. राजकुमार कीरतकर आणि त्यांच्या चमू ने यशस्वीरीत्या राबविला. कार्यक्रमास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ.विंकी रुघवानी,डॉ.संजय मराठे, डॉ. गिरीश चरडे, डॉ. कृतीश बालपांडे आणि डॉ.आर.जी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.


प्रवीण डहाके यांनी प्रभावी सूत्र-संचालन आणि मुख्य आयोजन अध्यक्ष डॉ वसंत खळतकर यांनी आभार प्रदर्शन केले. सुरेश भट सभागृह,नागपूरला होणारे ५५वेभारतीय बालरोग परिषद:पेडीकॉन-२०१८ या प्रतिष्ठीत आयोजनाचे मुख्य आयोजन अध्यक्ष- डॉ. वसंत खळतकर, मुख्य आयोजन सचिव डॉ. जयंत उपाध्ये आहेत. डॉ. उदय बोधनकर हे या आयोजनाचे मुख्य आश्रयदाता आहेत, अशी माहिती पेडीकॉन-२०१८ आयोजनाचे मिडिया प्रमुख डॉ. अविनाश गावंडे आणि प्रभारी डॉ सूचित बागडे यांनी दिली.