Published On : Wed, Jan 3rd, 2018

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मते मित्र परिवारातर्फे महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन

Advertisement


नागपूर: ०३ जानेवारी २०१८ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संत रविदास सभागृह हनुमान नगर, नागपूर येथे महिलांसाठी मोहन भाऊ मते मित्र परिवारातर्फे सविताताई मते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयाताई मारोतकर उदघाटाक डॉ. गिरी सोनी प्रमुख उपस्थिती नीता ठाकरे, सद्यस्य राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन तसेच नगरसेविका दिव्या धुरडे, स्वाती आखातकर, मनीषा ताई कोठे आणि लोकमत सखी मंचाच्या संयोजिका नेहाताई जोशी उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शक्ती च्या उद्धारासाठी केलेल्या कार्यचा उल्लेख व्यक्ततांनी आपल्या भाषणात व्यक्त केले व उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यास संबोधित केले.

कार्यक्रम दरम्यान सुप्रसिद्ध नकलाकार संगीता टेकाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा एकपात्री प्रयोग सादर केला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.असेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम आयोजिय व्हावे जेणेकरून आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचं कार्याची महानता कळेल कार्यक्रमच्या यशस्वी करता मोहन मते मित्र परिवार तर्फे अर्पणा माणेकर, स्मिता माटे, स्मिता शर्मा, ठाकरे ताई व आदींचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.