Published On : Thu, Aug 19th, 2021

काटोल-नरखेड तालुक्यात नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन

Advertisement

लोकनेते मा.श्री. रणजितबाबू देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काटोलचे माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या वतीने काटोल व नरखेड तालुक्यात 21ऑगस्ट ते 08 सप्टेंबर’21 पर्यंत नि:शुल्क रोगनिदान, रूग्ण भरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या निःशुल्क शिबिरांत लता मंगेशकर हाॅस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर च्या जनरल मेडिसीन, शल्य-चिकित्सा,बाल रोग,अस्थिरोग, प्रसुती/स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, छातीरोग, दंतरोग व चर्मरोगांसहित इतर सर्व रोगांच्या रुग्णांची विशेषज्ञद्वारा निःशुल्क तपासणी व मार्गदर्शन करण्यात येईल. यावेळी नि:शुल्क औषध वितरणसुद्धा करण्यात येईल.

पुढील उपचारासाठी रुग्णांना लता मंगेशकर हाॅस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथील जनरल वॉर्डमध्ये भरती केल्यास त्या रुग्णांना 100% निःशुल्क उपचार व 100% निःशुल्क ऑपरेशनचा लाभ मिळेल. सर्व तपासण्यासुद्धा निःशुल्क करण्यात येतील. फक्त औषधी व बाहेरील साहित्यांचाच खर्च रुग्णाला करावा लागेल.

Advertisement
Advertisement

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल, सीताबर्डी, नागपूर येथे निःशुल्क हृदयविकार उपचार, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी व हार्ट ऑपरेशन करण्यात येईल.

जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिरांचे आयोजक डॉ आशिष देशमुख यांनी केले आहे.

*शिबिरांचे वेळापत्रक-*
21ऑगस्ट 2021- संत कबीर विद्यालय, सोनोली,
सकाळी 10 ते 2

25 ऑगस्ट 2021- सांस्कृतिक भवन, भिष्णूर,
सकाळी 10 ते 2

28 ऑगस्ट 2021- जि.प.प्राथमिक शाळा, लाडगाव,
सकाळी 10 ते 2

02 सप्टेंबर 2021- जि. प. प्राथमिक शाळा, खैरगाव,
सकाळी 10 ते 2

08 सप्टेंबर 2021- जि. प. प्राथमिक शाळा, पुसागोंदी,
सकाळी 10 ते 2

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement