Published On : Fri, Sep 18th, 2020

सेवा सप्ताह निमित्य खासदार डाॅ विकास महात्मे द्वारे जिल्ह्यात नेत्र शिविरांचे आयोजन

Advertisement

नागपुर– पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्याने 14 ते 21 सप्टेंबर हा “सेवा सप्ताह” पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यसभा खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी महात्मे आय बॅक आय हाॅस्पीटल च्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेत्रशिबीरांचे आयोजन केले आहे.

गुरूवारी माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसा निमित्य संत रोहिदास चर्मकार भवन खरबी येथे नेत्र तपासणी शिविर आयोजित करण्यात आले.शिविरात 58 लोकांन ची तपासणी करून 32 लोकांना निःशुल्क चश्मे दिले गेले आणि 7 लोकांन ची निःशुल्क मोतियाबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.यावेळी जि. पं. सदस्य सुभाष गूजरकर ,पंचायत समिती सदस्य शूंभागी गायधने ,माजी सरपंच नरेंद्र नांदुरकर ,राजकुमार वंजारी,भाजप महामंत्री नितीन शेळके उपस्थित होते.

महात्मे आय बॅक आय हाॅस्पीटल द्वारे पारशिवनी महात्मे आय बॅक आय हाॅस्पीटल खासदार आदर्श गाव भागेमाहेरी, कुही, क़ळमेश्वर तालुक्यातील बोरगाव धुरखेडा येथे शिविर घेण्यात आले. या शिविरात नि:शुल्क नेत्रतपासणी, चश्मे वाटप करण्यात आले. तसेच गरजू रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिविरांमध्ये भाजप कार्यकर्तेही उस्फूर्त पणे सहभागी होत आहेत.

Advertisement

दिल्ली येथे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने खासदार डाॅ महात्मे स्वत: शिविरात सहभागी होऊ शकत नसले तरी त्यांची टीम – वासुदेव खोब्रागडे, सतीश बुरघाते ,श्रीकांत जांभूळकर, राकेश पाटील,निश्चल वरूडकर, प्रशांत निवांत हे पूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.