Published On : Mon, Feb 17th, 2020

18 फेब्रुवारीला गडचिरोलीत प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन

नागपूर: केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्‍या सहकार्याने, उद्या मंगळवार 17 फेब्रुवारीला स्थानिक हॉटेल वैभव गडचिरोली येथे ग्रामीण प्रसारमाध्‍यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे सकाळी 11 ते सायंकाळी 5.15 या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे.

Advertisement

केंद्रीय सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार या कार्यशाळेचे उद्घाटन करतील . उद्घाटन समारंभ सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत होईल.

Advertisement

उद्‌घाटन सत्रानंतर पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत तीन तांत्रिक सत्रामध्ये व्याख्याने होणार आहेत. दुपारी 12 ते 1.45 दरम्यान होणा-या प्रथम तांत्रिक सत्रामध्ये ‘आदिवासी भागांमध्ये ग्रामीण उद्योगांचे महत्व’ या जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी. कोहाडे मार्गदर्शन करतील. नागपूर आकाशवाणी वृत्त विभागाचे सहायक संचाललक डॉ. मनोज सोनोने, ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी इलेक्ट्रोनिक माध्यमांची भूमिका ’ यासंदर्भात मार्गदर्शन करतील. ‘विकास संवादामध्ये प्रत्रकारांची भूमिका ’ या विषयावर लोकमत दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने मार्गदर्शन करणार आहेत.

Advertisement

दुपारी 2.30 ते 3.45 दरम्यान होणा-या दुस-या तांत्रिक सत्रात , जेष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर , हे ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्र व समाज माध्यमांची भूमिका या विषयावर व्याख्यान देतील. शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहाय्यक संचालक श्री शशिन्‌ राय ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’ या विषयावर सादरीकरण करतील.

सायंकाळी ४.४० ते ५.१५ दरम्यान प्रतिसाद- संकलन व कार्यशाळेचा समारोप होईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement